नितीन गडकरी ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

महाराष्ट्रात भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही : नितीन गडकरी

backup backup

नागपूर; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रात भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केले. गोव्यातील भाजपच्या कामगिरीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते.

गोव्यामध्ये भाजपने केलेल्या कामगिरीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी नितीन गडकरी यांनी गोवा निवडणुकीमध्ये फडणवीसांनी चांगले नेतृत्व केल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.

यावेळी बोलत असताना त्यांनी सांगितले की, गोवा निवडणुकीमध्ये जनतेने भाजपला बहुमत दिले. जनतेने भाजपवर विश्वास दाखविला आहे. गोव्यासह चार राज्यांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आहे. पुढे असेही म्हणाले की, मोदीजींनी केलेल्या चांगल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. जातीयवादावर राजकारण आपण करत नाही. लोक जाती धर्म यापेक्षा विकासाला मत देतात.

आगामी काळातील निवडणुकांबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितले की, गरीबांसाठी शाश्वत विकासाच्या कामावर भर देऊ. त्याचबरोबर महाराष्ट्रातही भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही, हे महत्त्वाचे विधान देखील त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, त्यांनी नागपूर पालिकेतही भाजपचीच सत्ता असणार असे त्यांनी आश्वासन या कार्यक्रमप्रसंगी दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT