नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात बोलेरो पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिला मजुर ठार झाल्या झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर जाऊन आदळल्याने आज पहाटे ही दुर्घटना घडली. (nagpur accident)
मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे असे अपघातात ठार झालेल्या महिला मजुरांची नाव आहेत. पाच महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आज पहाटे काटोल तालुक्यातील ईसापुर – घुबडमेट रस्त्यावर हा अपघात झाला आहे. या परिसरातील सध्या संत्र्याच्या बागेत संत्री तोडण्याच्या काम सुरू आहे. त्यासाठी या महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने कामासाठी जात होत्या.
काटोल येथून पहाटेवाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळली. अपघातात इतका भीषण होता की. त्याच्यामध्ये तीन महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाला.
त्याचबरोबर एका महिलेला रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला आहे. इतर पाच जखमी महिलांवर रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु आहेत.
हेही वाचलं का?