पुढारी ऑनलाइन डेस्क : Indian Air Force : भारतीय वायुसेनेच्या 4 राफेल लढाऊ विमानांनी हिंदी महासागर क्षेत्रात चित्तथरारक युद्धाभ्यास करत शक्तीप्रदर्शन केले. या राफेल लढाऊ विमानांनी हिंदी महासागर क्षेत्रावर सलग 6 तासापेक्षा जास्त वेळेपर्यंत उड्डाण भरून युद्धाभ्यास केला.
याबाबत एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या विमानांनी पूर्वेकडील हासीमारा हवाई अड्ड्यातून उड्डाण केले. त्यानंतर या अभियानांतर्गत अनेक प्रकारचे युद्धाभ्यास आणि मॉक ड्रिल करण्यात आले. चीन सध्या हिंदी महासागरात आपली ताकद वाढवत आहे. अशा परिस्थितीत भारतीय राफेल विमानांच्या या युद्धाभ्यासाने निश्चितच चीनला धडकी भरवली आहे.
भारतीय हवाई दलाने या मिशनबद्दल ट्विट देखील केले – "भारतीय वायुसेनेच्या राफेल विमानाने हिंदी महासागर क्षेत्रात सहा तासांपेक्षा जास्त काळ लांब पल्ल्याच्या मोहिमेसाठी उड्डाण केले. विमानानेही मार्गात मोठ्या बळावर लढा दिला."
भारत-चीन संबंध गेल्या 3-4 वर्षापासून सर्वाधिक तणावपूर्ण झाले आहे. 2020 मध्ये गलवान घाटीत दोन्ही देशाच्या सैन्यात झालेल्या चकमकीत देशाचे 20 जवान शहीद झाले होते. तसेच यावेळी चीनचे देखील 40-45 सैनिक मारले गेले. मात्र, चीनने याचा अधिकृत आकडा कधीही जाहीर केला नाही. त्यानंतर भारत-चीनचे संबंध तणावपूर्ण राहिले आहे.
हे ही वाचा :