पुढारी ऑनलाइन डेस्क : Heavy rain बेंगळुरू शहरात गेल्या काही दिवसात सततच्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले आहे. त्यामुळे बंगळुरूमध्ये काही भागात जिकडे-तिकडे पाणीच पाणी अशी गत झाली आहे. कोरमंगलासह बेंगळुरूच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि सामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले.
एका स्थानिकाने सांगितले की, Heavy rain मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे आणि त्यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. आणखी एका स्थानिक रहिवाशाने एएनआय या संस्थेला सांगितले, "खूप पाऊस झाला आहे. सकाळी उठल्यावर पाणी साचलेलं पाहिलं. रस्त्यावर पाणी दुभाजकाच्या पातळीपर्यंत आलं होतं. त्यानंतर आम्ही रस्ता आणि तळघरातून पाणी उपसायला सुरुवात केली. माझ्या बिल्डिंगमध्ये संपूर्ण तळघर पाण्याखाली बुडाले आहे"
"Heavy rain : ही परिस्थिती दरवर्षी उद्भवते आणि खराब ड्रेनेज सिस्टममुळे त्यांना पाणी बाहेर काढावे लागते. दरवर्षी असे घडते, पाऊस पडल्यानंतर पाणी साचते आणि पाणी उपसून काढावे लागते. यावर कायमस्वरूपी उपाय नाही. रस्ता होत असताना ड्रेनेजची व्यवस्था नीट तयार केलेली नव्हती. त्यामुळे जनतेला अनेक अडचणी येतात. अनेक स्त्रिया प्रत्यक्षात घसरून पाण्यात पडल्या आहेत," असे दुसर्या एका स्थानिकाने सांगितले.
याआधी जुलैमध्ये कर्नाटकात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला होता, त्यानंतर बचाव मोहीम आणि मदतकार्य करावे लागले होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनाही केंद्राकडून आर्थिक मदत घ्यावी लागली.