पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोंढवा भागात मध्यरात्री तडीपार गुंडाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमित उर्फ मोन्या काकासाहेब जाधव,असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. सुमित शिवनेरी नगर भागात राहायला होता. त्याच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गेल्यावर्षी त्याला शहरातून पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी तडीपार केले होते. रात्री एकच्या सुमारास सुमित कोंडव्यातील अशोका म्यूज सोसायटी परिसरातून दुचाकीवरून निघाला होता. त्यावेळी तिघा हललेखोरांनी त्याला अडवले आणि कोयत्याने वार केले. या घटनेत त्याचा मृत्यु झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.