पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या गावांमधील समस्यांकडे महापालिका व राज्य शासनाच्या यंत्रणेकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचे नगरसेवक असणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेची निवडणून लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी रविवारी नऱ्हे येथे खा. सुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या, समाविष्ट गावांमध्ये कचरा, रस्ते, पाणी आणि सांडपाणी आदींची उणीव आहे. हक्काचा नगरसेवक असेल तर मुलभूत प्रश्नाची समस्या सुटण्यास मदत होते, त्यामुळे लवकरात लवकर महापालिका निवडणुक होणे गरजेचे आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वारंवार महापालिका आयुक्तांची दोन दिवसातही भेट घेणार असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, माजी नगरसेवक विकास दांगट, शहर सरचिटणीस भुपेंद्र मोरे, महिला आघाडीच्या माजी शहराध्यक्षा स्वाती पोकळे, स्वप्नपूर्ती महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा मोरे आदींसह नऱ्हे परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी माडल्या 'या' व्यथा :