IPL 2024

MI vs SRH : नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय

दिनेश चोरगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, या सामन्यात त्यांचा संघ एका बदलाने खेळताना दिसेल. अंशुल कंबोज याला पदार्पणाची संधी मिळाली आहे. गेराल्ड कोएत्झी या सामन्यात दिसणार नाही. त्याचवेळी, मयंक अग्रवाल हैदराबादच्या प्लेइंग 11 मध्ये परतला आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार) अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

SCROLL FOR NEXT