मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कमाल तापमानातील वाढ पाहता मुंबईत उन्हाचा कहर कायम आहे. रविवारी 36 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. सोमवारी त्याचीच पुनरावृत्ती झाली. ( Mumbai Temperature )
मुंबई शहर आणि उपनगरांमधील गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. सांताक्रुझ वेधशाळेनुसार, सोमवारी किमान 20 आणि कमाल 36 अंश सेल्सिअस तापमान होते. मंगळवारी (21/34) किमान तापमानात वाढ तर कमाल तापमानात घट अपेक्षित आहे. बुधवारी (19/34) किमान तापमान विशीच्या आत येईल. मात्र, कमाल तापमान मंगळवारचेच राहील. गुरुवारी किमान तापमानात (18/35) आणखी घट असली तरी कमाल तापमान पस्तिशीवर पोहोचेल.
कुलाबा वेधशाळेत, रविवारी किमान 21 आणि किमान 32 अंश सेल्सिअसची नोंद झाली. सोमवारी, किमान 21 आणि कमाल 32 अंश सेल्सिअस इतके तापमान होते.मंगळवारी किमान तापमानात एकाने वाढ होईल. कमाल तापमान एकाने घटेल. किमान तापमानातील घट पुढील तीन दिवस कायम राहील. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ( Mumbai Temperature )