मुंबई : पुढारी वृत्तसेवा; झवेरी बाजाराला बॉम्बची धमकी देणारा फेक कॉल करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश सुतार असे या आरोपीचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील प्रख्यात असलेल्या झवेरी बाजाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल आला होता. या कॉलने मुंबई पोलिसांसह सर्वच तपास यंत्रणा सतर्क झाल्या. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
दिनेश सुतार याने हा कॉल केल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलीस सुतार याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा :