मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले.
ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो…पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे – फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी… गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते… स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके… ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याने युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी युवकांनी फलक दाखवून आणि घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा