Latest

Lok Sabha Election 2024 : ‘उत्तर पूर्व’ मध्ये भाजपचे मताधिक्य घटण्याची शक्यता !

अनुराधा कोरवी

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघात विजय मिळवणे भाजपसाठी तितकेसे सोपे राहिलेले नाही. या मतदार संघात 2019 मध्ये भाजपचे मताधिक्य 4.34 टक्क्यांनी घटले होते. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मताधिक्य 7.54 टक्क्यांनी वाढले होते. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष असल्यामुळे मताधिक्य वाढवण्याची शक्यता आहे. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघातील 1967 पासूनचा इतिहास लक्षात घेता, येथे काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. 1977 मध्ये या मतदार संघात जनता पार्टीचे सुब्रह्मण्यम स्वामी निवडून आले होते. 1998 पासून या मतदार संघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपला झेंडा फडकवला होता. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य तर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी घटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने येथे विजयाची मोहर उमटवली. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपने मुसंडी मारली. 2009 मध्ये घटलेले मताधिक्य 29.42 टक्क्यांनी वाढले. यावेळी भाजपला 60 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्य आठ टक्के घसरले होते.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सुमारे 56 टक्के मते मिळाली. मात्र, त्यांचे मताधिक्य 4.34 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्य 7.54 टक्क्यांनी वाढले. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत भाजपला आपले मताधिक्य वाढवावे लागणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे गटासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष असल्यामुळे या मतदार संघातील आघाडीचे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. आघाडीचा मताधिक्य वाढणे भाजपसाठी धोकादायक मानले जात आहे. 2019 मध्ये भाजपसोबत ठाकरे गट असतानाही भाजपचे मताधिक्य घटले होते. आता तर भाजपसोबत ठाकरे गट नाही, त्यामुळे मताधिक्य अजूनच घटू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ( Lok Sabha Election 2024 )

कोणत्या भागात कोणाचे प्राबल्य?

युतीचे प्राबल्य

मुलुंड पूर्व-पश्चिम
घाटकोपर पूर्व-पश्चिम

महाआघाडीचे प्राबल्य

भांडुप पूर्व-पश्चिम
कांजूरमार्ग पूर्व-पश्चिम
विक्रोळी पूर्व-पश्चिम
मानखुर्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT