पुढारी ऑनलाईन डेस्क : इशान किशनची २५ चेंडूमध्ये ५८ धावांची आक्रमक खेळी, सुर्यकुमार यादवच्या २५ यादवच्या २५ चेंडूमध्ये ४३ धावा आणि पियुष चावलाच्या कंजूस गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने केकेआरचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि केकेआर आमने-सामने होते. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या केकेआरने मुंबईसमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले आहे. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज शतक केले. अय्यरच्या शतकी खेळीच्या जोरावर केकेआरने १८५ धावा केल्या. मुंबईने केकेआरचे हे आव्हान १७.४ षटकांमध्ये सहजरित्या गाठले.
मुंबईकडून ऋतिक शौकीनने २ विकेट्स, तर पियुष चावलाने ४ षटकांमध्ये केवळ १९ धावा देत १ विकेट पटकावली. कॅमरन ग्रीन आणि मेरेडिथनेही प्रत्येकी १ विकेट घेतली. मुंबईच्या डी यान्सनची केकेआरच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्याने ४ षटकांमध्ये ५३ धावा देत १ विकेट पटकावली. तर केकेआरकडून सुयश शर्माने २ तर शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी १ विकेट पटकावली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.