पुढारी ऑनलाईन : मुंबईतील धारावी परिसरातील अशोक मिल कंपाऊंडमधील गारमेंटला आग लागली. या आगीत एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून, मदतकार्य सुरू आहे. अशी माहिती मुंबई महानगपालिकेने दिली आहे.
धारावी परिसरातील अशोक मिल कंपाऊंडमध्ये असलेल्या किमान चार ते पाच गारमेंट युनिटला आज (दि.०१) दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीचा फटका बसल्याचे सांगितले आहे.