Latest

फलंदाजीला जाण्यापूर्वी धोनीचे डोळे सर्व काही सांगून गेले : फ्लेमिंग

backup backup

महेंद्रसिंह धोनाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या क्वालीफायर सामन्यात ६ चेंडूत १८ धावांची खेळी करुन संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी ड्रेसिंग रुममध्ये त्यावेळी काय घडले हे सांगितले. त्यांनी फलंदाजीला जाण्यापूर्वी धोनीचे डोळे सर्व काही सांगून गेल्याचे वक्तव्य केले.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या क्वालीफायर सामन्यात चेन्नईला विजयासाठी ११ चेंडूत २४ धावांची गरज होती. असे असताना चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रविंद्र जडेजा ऐवजी स्वतः धोनी फलंदाजीसाठी आला. त्याने गेल्या गेल्या दुसऱ्याच चेंडूवर आवेश खानला मिडविकेटला षटकार खेचला. त्यानंतर टॉम करन टाकत असलेल्या शेवटच्या षटकात तीन चौकार मारत चेन्नईचा विजय दोन चेंडू राखून साकारला.

या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, 'मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी कर्णधार धोनी तुमच्याकडे पाहतो आणि धोनीचे डोळे तुम्हाला सांगतात की मी जातो. त्याने कित्येक वेळा हे केले आहे हे धोनीचे डोळे सांगून जातात. आजही तसेच झाले. त्यामुळे मी त्याला मागे खेचले नाही आणि त्याचा निकाल तुमच्या समोर आहे.'

फ्लेमिंग पुढे म्हणतात, धोनीने त्यांच्यासोबत मोठी तांत्रिक चर्चा केली होती. फ्लेमिंग म्हणाले, 'आम्ही खूप चर्चा केली. आम्ही या २० षटकात जास्त वेळा बोललो. आम्ही इतका वेळी यापूर्वी कधी बोललो नव्हतो. यात मुख्य करुन तांत्रिक चर्चा होती. कोणती गोष्ट कारगर होईल याच्यावर चर्चा झाली.'

क्वालीफायर सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम दिल्लीला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. दिल्लीने पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकात ५ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली. त्याला प्रत्युत्तर देताना ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांनी ११० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर धोनीने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत सामना संपवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT