Latest

ब्रेकिंग ! कसब्यात अखेर बापट काय करणार…

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : खासदार गिरीश बापट शांत राहिल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. कसबापेठ मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले विद्यमान खासदार गिरीश बापट शेवटी आज प्रचारासाठी बाहेर पडणार आहेत. बापट प्रचारात उतरले नसल्याने, भाजपमध्ये अस्वस्थता होती, तर विरोधकांना हायसे वाटत होते. बापट यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रक प्रसिद्धीस देत त्यांच्या आजारपणाची माहिती लोकांना दिली. तसेच, वैयक्तिक प्रचारात सहभागी होता येत नसल्याचे सांगितले होते. बापट, टिळक यांची नाराजी, ब्राह्मण समाजाला नाकारलेली उमेदवारी यामुळे भाजपची हक्काची मतपेटी असलेल्या ब्राह्मण समाजाचे मतदार काय करणार, हाच प्रश्न माध्यमांकडून वारंवार भाजपच्या नेत्यांना विचारला जात होता.

बापट यांनी त्यांची सून स्वरदा यांना कसबापेठ मतदारसंघातून उमेदवारी मागितल्याची चर्चा कार्यकर्त्यांत होती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश किंवा चिरंजीव कुणाल यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुकते माप हेमंत रासनेच्या पारड्यात पडले. मात्र, त्याचवेळी महाविकास आघाड़ीने रविंद्र धंगेकरसारखा तगडा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरविला. त्याच्यामागे सर्वांनी थेट ताकद उभी केल्याने भाजपला गेली पाच दशके सोप्या ठरलेल्या या बालेकिल्ल्यात अक्षरशः घाम फुटला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या शनिवारी महाशिवरात्रीला बापट यांना भेटण्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटून गेले. फडणवीस काल त्यांना भेटले. भाजपचे एवढे नेते भेटण्यास येत असल्याने बापट प्रचारास उतरण्यास राजी झाले. ते गुरुवारी सायंकाळी मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT