मुंबई ; पुढारी ऑनलाईन : 'नागिन' फेम मौनी रॉयने आता छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर झेप घेतली आहे. 'ब्रह्मास्त्र'मध्ये ती प्रमुख खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मौनी रॉय सोशल मीडियातही चांगलीच सक्रिय असते. आता तिने समुद्र किनार्यावरील एक टॉपलेस छायाचित्र शेअर केला0 आहे. तिचा हा बोल्ड फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटस्चा वर्षाव केला आहे.
सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करून ती चर्चेत आली आहे. मौनी रॉयने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती बीचवर सूर्यास्ताच्या सुंदर दृश्याचा आनंद घेताना दिसत आहे. लोकांना मौनी रॉयची स्टाईलही आवडली आहे. तिचे हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मौनी रॉयने १४ तासांपूर्वी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताच तिच्या फोटोवर चार लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. ती पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली दिसत आहे. सूर्यास्त आणि समुद्राच्या मनमोहक दृश्याकडे पाहताना दिसत आहे. मौनी रॉयच्या फोटोशूटवर नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत.
मौनी रॉयचा प्रत्येक अंदाच वेगळाच असतो. तिची हीच गोष्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. मौनीने छोट्या पडद्यावरील आपल्या भूमिकेने आपला एक चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. अलीकडेच तिचे लग्नही झाले.
मौनी रॉय लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भटसोबत 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
'ब्रह्मास्त्र' सिनेमात अभिनेत्री मौनी रॉयचा (Brahmastra Mouni Roy Look) लूक काहीसा भीतीदायक दाखवण्यात आला आहे. या सिनेमात तिचा अंदाज धमाकेदार असणार आहे. सोशल मीडियावर तिच्या लूकचे विशेष कौतुक होत आहे. काही मीडिया वृत्तांनुसार अशी माहिती समोर आली आहे की मौनी रॉय या सिनेमात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये मौनी ब्लॅक आउटफिटमध्ये आणि चेहऱ्यावर गंभीर हावभाव पाहण्यास मिळत आहेत. आणखी एका दृश्यात तिच्या डोळ्यात आग दिसत आहे.