जगभरात अनेक महागडी फळे तसेच खाद्यपदार्थही मिळतात. मात्र, आपल्या देशात सर्वात महाग खाद्यपदार्थ कुठे मिळतात व ते कोणते आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का? अशाच काही पदार्थांची ही माहिती…
गोल्ड प्लेटेड डोसा
याचे नावही तुम्ही आजपर्यंत ऐकले नसेल. तुमचा विश्वास बसणार नाही; पण बंगळुरूच्या एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेला डोसा दिला जातो. लोक त्याला 'सोन्याचा डोसा' म्हणतात, इथे एक प्लेट सोन्याच्या डोशाची किंमत 1100 रुपये आहे.
पिझ्झा
दिल्ली येथे एका हॉटेलात ग्रे गूज वोडकासोबत सर्व्ह केला जाणारा हा पिझ्झा ग्राहकांना लॉबस्टरच्या टॉपिंगसह दिला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा पिझ्झा ऑर्डर केल्यावर तुम्हाला 10 हजार रुपये द्यावे लागतील. शेफ स्वतः ते तुमच्या टेबलावर आणेल. जर तुमच्या खिशात पैशांची कमतरता नसेल, तर हा पिझ्झा नक्कीच तुम्हाला पैसे वसूल सिद्ध होईल.
सुशी
सुशी हा एक जपानी पदार्थ आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत चवदार सुशी मिळते. मात्र, यासाठी तुम्हाला 8,725 रुपये देखील द्यावे लागतील.
पेकिंग डक
दिल्लीत श्रीमंत लोकांच्या आवडीचे एक हॉटेल आहे. येथे सर्वात महाग डिश पेकिंग डक आहे ज्याची किंमत 5200 रुपये आहे. बदकांच्या मांसापासून तयार केलेली ही डिश अनेकांना आवडते.
लॅम्ब व्हेट्रो
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात 'लॅम्ब व्हेट्रो' नावाची डिश उपलब्ध आहे ज्याची किंमत 4000 रुपये आहे. नक्कीच ही किंमत खूप जास्त आहे; पण या डिशच्या चवीसमोर ही किंमत खूपच कमी आहे.
ग्रील्ड पोर्क चॉप
मुंबईतील एका रेस्टॉरंटला अनेक श्रीमंत खवय्ये भेट देतात. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथून मुंबईचे भव्य नजारेही दिसतात. येथे तीन लोकांच्या जेवणाची किंमत 16000 रुपये आहे. जर तुम्हाला येथे ग्रील्ड पोर्क चाप खायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 2250 रुपये मोजावे लागतील.
बटर चिकन
हैद्राबादच्या एका रेस्टॉरंटमध्ये तयार होणारे बटर चिकन परदेशातून येणार्या एका विशिष्ट प्रकारच्या पाण्यात शिजवले जाते आणि त्यानंतर ते बोरोसिल कंटेनरमध्ये वाढले जाते. येथे बटर चिकन खाण्यासाठी तुम्हाला 6000 रुपये मोजावे लागतील.
एंगस टी-बोन स्टिक
दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये इटालियन रेस्टॉरंट आहे. हे लॅव्हिश डायनिंग सेटअपसाठी प्रसिद्ध आहे. हे रेस्टॉरंट प्रसिद्ध जपानी कंपनी डिझाईन स्पिन स्टुडिओने डिझाईन केले आहे. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे खाण्यासाठी व उत्तम चवीसाठी पैशाचा विचार करत नाही, तर तुम्ही या रेस्टॉरंटमधील 'एंगस टी-बोन स्टीक' नक्की चाखून पाहा. यासाठी तुम्हाला 8,500 रुपये मोजावे लागतील!