Latest

Monsoon Updates : गुजरातमध्‍ये पुराचे १० बळी, ७ जिल्‍ह्यांमध्‍ये पूरसदृश परिस्थिती

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातमध्ये गेल्या तीस तासांमध्‍ये मुसळधार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील जुनागढ, कच्छ, जामनगर, वलसाड, मेहसाणा, सुरत आणि नवसारी जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे एसडीआरएफ आणि हवाई दल बचाव आणि मदत कार्यात तैनात करण्यात आले आहे. ( Monsoon Updates )

मुसळधार पावसाने गुजरातच्या सात जिल्‍ह्यांमधील सखल भागात पाणी शिरले असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) च्या तुकड्या कच्छ, जामनगर, जुनागढ आणि नवसारीमधील पूरचा फटका बसलेल्‍या भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

दरम्‍यान, आज (दि.२) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी राज्यातील पूरसदृश परिस्थितीवर चर्चा केली. या कठीण काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकार जनतेच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही त्‍यांनी दिली.
मुसळधार पावसामुळे परिसरात पूर आल्याने जुनागढमधील सुत्रेज गावाजवळ अडकलेल्या दोन लोकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (SEOC) नुसार, गुजरातमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये गेल्या दोन दिवसांत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

 Monsoon Updates : १३ राज्‍यांमध्‍ये मुसळधार पावसाचा इशारा

येत्या २४ तासांत १३ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात पुढील पाच दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरातमध्ये गेल्या 30 तासात मुसळधार पावसामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे.

मुसळधार पावसामुळे हिमाचलमध्ये गेल्या आठवड्यात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत नाल्यात पडून एका ऑटोचालकाचा मृत्यू झाला. तीन राज्यांमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ महामार्ग (NH 7) गेल्या 13 तासांपासून बंद आहे. शनिवारी तीन दिवसांत दुसऱ्यांदा येथे दरड कोसळली. यापूर्वी 29 जून रोजीही भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग 17 तासांसाठी बंद करण्यात आला होता.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT