नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : मागच्या दोन महिन्यांपासून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली तर कधी रवी शास्त्री यांच्यासोबत विराटचे खटके उडाल्याची माहिती समोर आली. विराटने क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यावर मोठे घमासान झाले दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोदम्मद शमीने विराटचे मोठे कौतुक केले आहे. (mohammed shami)
कोहलीनंतर टीम इंडियाचा पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मागच्या काही माहिन्यांपासून कोहलीच्या खेळावर टीका होताना दिसत आहे. यामुळे कोहलीच्या खेळावर निवड समितीबरोबर सर्वांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
या प्रश्नांना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (mohammed shami) दिले आहे. यामुळे विराट प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
कोहलीला पाठिंबा देत मोहम्मद शमीने टीकाकारांना फटकारले आहे. शमीचा असा विश्वास आहे की खेळाडूंची क्षमता त्यांनी केलेल्या शतकांच्या संख्येवरून ओळखली जात नाही.
कोहलीकडून शतक होत नसेल तर? तो धावा काढत नाही असे नाही. अलीकडे त्याने अनेक उत्कृष्ट अर्धशतके झळकावली आहेत. याकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तो म्हणाला, सामन्यादरम्यान ५०-६० धावांची खेळीही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यावर शंका घेणे थांबवा. कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना शमी म्हणाला, त्याच्या एनर्जीचा उपयोग संघातील इतर खेळाडूंमध्ये उत्साह भरण्यासाठी झाला. तो सर्व गोलंदाजांना पूर्ण पाठिंबा द्यायचा आणि त्यांना त्यांची क्षमता दाखवण्याची संधी द्यायचा असे शमीने म्हंटले आहे.