Latest

अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही; लवकरच हल्ल्याचा सुत्रधार समोर येईल- संदीप देशपांडे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी घाबरणार नाही. घाबरवण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. अशा हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही. माननीय  एकनाथ शिंदे  यांचा फोन आलेला. त्यांनी माझी काळजीपूर्वक चौकशी केली. माझ्या संरक्षणासाठी दोन पोलीस दिले आहेत. पण सरकराला मला सांगायच आहे की, आम्ही कोणाला घाबरत नाही अजिबात भीक घालत नाही. सरकारला माझी नम्र विनंती आहे त्यांनी माझ सिक्युरीटी काढून घ्यावी. संरक्षण त्या लोकांना पुरवा ज्यांना आता गरज आहे. असं वक्तव्य आपल्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात बोलत असताना  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. वाचा सविस्तर बातमी. (MNS Sandeep Deshpande)

मॉर्निंग वॉकला गेल्यावर हल्ला

मनसे नेते  संदीप देशपांडे काल (शुक्रवार,दि.३) शिवाजी पार्कात नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. यावेळी त्‍यांच्यावर तोंडाला मास्‍क लावून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी त्‍यांच्यावर हल्‍ला करत लोखंडी रॉड आणि स्‍टंम्‍पने मारहाण केली. या हल्‍ल्‍यात देशपांडे जखमी झालेआहेत. अचानक हा हल्‍ला झाल्‍याने बेसावध देशपांडे या हल्‍ल्‍यात जखमी झाले. यावेळी शिवाजी पार्कात मॉर्निंग वाकला आलेल्‍या लोकांनी त्‍यांना हल्‍लेखोरांपासून वाचवण्याचा प्रयत्‍न केला असता हल्‍लेखोर तेथून पसार झाले. यानंतर स्‍थानिक नागरिकांनी त्‍यांना हिंदुजा रूग्‍णालयात दाखल केले. दरम्यान  त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचे  फुटेज सीसीटीव्हीमध्ये कैद्य झाले होते. या आधारे शोधमोहीम सुरु होती. या संशयित आरोपींना आज (दि.४) ताब्यात घेण्यात आले आहे.

MNS Sandeep Deshpande : आम्हाला माहीत आहे कोणी हल्ला केला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे हे आपल्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात  माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, सर्व पक्षांचे, नेत्यांचे आभार ज्यांनी माझी भेट घेवून, कॉल करुन चौकशी करत, काळजी आणि प्रेम व्यक्त केले. माझ्यावर झालेला हल्ल्याने मी घाबरणार नाही आणि आम्हाला कोणी घाबरवयाचा  प्रयत्न  करु नये. माझ्यावर अचानक वार केला मला कळचल नाही नेमक काय झालं आहे. हल्लेखोराचा मला डोक्यावर मारायचा प्रयत्न होता. ते बोलताना असेही म्हणाले की, हे कोणी  केलं आहे आम्हाला माहीत आहे. हल्लेखोरांचे कोच देखील माहीत आहेत.  लवकरच हे प्रकरण समोर येईल. मी  माझ म्हणंण सविस्तररित्या एफआयआर मध्ये मांडल आहे. भांडूप कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांचा तपास योग्य रितीने सुरु आहे.  माझा मुंबई पोलिसांवर संपुर्ण विश्वास आहे.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली

माझ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यांनी माझी काळजीपूर्वक चौकशी केली. माझ्या संरक्षणासाठी  दोन पोलिस दिले आहेत. माझी सरकराला विनंती आहे की, "आम्ही कोणाला घाबरत नाही. असल्या हल्ल्यांना अजिबात भीक घालत नाही. सरकारला माझी नम्र विनंती आहे, त्यांनी माझी सिक्युरीटी काढून घ्यावी. सरक्षण त्या लोकांना पुरावाव ज्यांना आता गरजेच आहे. असं म्हणतं त्यांनी हल्लेखोरांच्या पाठीमागील सुत्रधारांवर निशाणा साधला आहे.

MNS Sandeep Deshpande :  विरप्पन गॅंग

माझ्यावर झालेल्या हल्ल्यात कोणती  विरप्पन गॅंग हे सर्वांना माहित आहे. महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या कंपन्यावर आरोप करत देशपांडे यांनी म्हंटल आहे की, कोरोना काळात त्यांचा ट्रनओव्हर अचानक कसा काय वाढला. कोव्हीड काळात नेमकं काय झालं. दोन दिवसात नवा घोटाळा बाहेर काढणार होतो याचा सुगावा त्यांना लागल्यानेच हा हल्ला झाला. पण आम्ही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढत राहणार.

संजय राऊत यांच मानसिक संतूलन ढासळलयं

संजय राऊत यांनी हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होतं की, मी यांना ओळखत नाही. जर शिवसेनेने हल्ला केला असता तर ते कोमामध्ये असते. यावर देशपांडे बोलत असताना म्हणाले की, संजय राऊत यांच मानसिक संतूलन बिघडलं आहे. यापूर्वीही मी त्यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली होती. संजय राऊत यांना माझी सहानुभूती आहे. त्यांच्यावर उपचार करायला हवेत. उद्धव ठाकरे हे तर मोठे डॉक्टर आहेत. त्यांचा सल्ला तर जागतिक आरोग्य संघटना पण घेते. माझ्य़ावर ज्यांनी हल्ला केला त्या बिचाऱ्यांचा काय दोष आहे. ज्यांनी हे केलं  केल आहे त्यामागचा खरा सुत्रधार लवकरच समोर येईल.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT