राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: राजगुरूनगरच्या वाडा रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. ३ सप्टेंबरला आमदार दिलीप मोहितें पाटील या ट्राफिक मध्ये अडकले. अर्धा तास या ट्राफिक मधुन त्यांची गाडी हळुहळु पुढे सरकत होती. महात्मा गांधी विद्यालय व पंचायत समिती चौक ठप्प होता. ट्राफिक पोलीस तिथे नसल्याने आमदार मोहिते पाटील यांचे सुरक्षा रक्षक खाली उतरून ट्राफिक सुरळीत करू लागले.
मात्र चारही बाजूने वाहने, विद्यार्थी अशी गर्दी असल्याने त्यांनाही पर्याय उपलब्ध होईना. अखेर आमदार मोहिते पाटील स्वतः उन्हात रस्त्यावर उतरले आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सुध्दा ट्राफिक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळाने वाहतूक सुरळीत चालू झाली.