पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोराममध्ये आज (दि.७) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत एका १०१ वर्षांच्या आजोबांनी आपली पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. (Mizoram Assembly Elections)
मिझोरममध्ये विधानसभेच्या ४० जागांसाठी १२७६ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. राज्यातील ८,५१,८९५ मतदार १७४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. राज्यात मुख्य लढत ही मिझो नॅशनल फ्रंट, झोराम पीपल्स मूव्हमेंट, काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. मिझोराम आणि काँग्रेसने सर्व ४० जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर भाजपने २३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आम आदमी पक्षानेही राज्यातील चार जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आज (दि.७) राज्यातील सर्व ४० जागांसाठी मतदान होत आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या विधानसभा निवडणुकीत १०१ वर्षांच्या आजोबांनी रुआंतलांग पीएस येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी चम्फई ज्या (वय८६) यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
पु झाडावला यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यास नकार दिला आहे. ते दृष्टिहीन आहेत. 1417 सरोन वेंग-II, आयझॉल येथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा