Latest

Mission Impossible 7 : टॉम क्रूझच्या ‘या’ चित्रपटाचा ट्रेलर झाला लीक

Arun Patil

पुढारी ऑनलाईन : हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या टॉम क्रूझचे (Mission Impossible 7) चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. टॉमला मोठ्या पडद्यावर पाहण्याची त्याच्या चाहत्यांची इच्छा यंदा पूर्ण होणार आहे. 2022 आणि 2023 मध्ये त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

या वर्षी टॉमच्या 1986 मध्ये आलेल्या 'टॉप गन' चित्रपटाचा सिक्वेल असलेला 'टॉप गन मॅव्हरिक' रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच त्याच्या प्रसिद्ध फ्रेंचाइजी चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल'चा सातवा भाग देखील 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या दोन्ही चित्रपटांसाठी तो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता, आता त्याच्या 'मिशन इम्पॉसिबल 7' (Mission Impossible 7) या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. बातमी अशी आहे की या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधीच लीक झाला आहे.

क्रूजच्या बहुप्रतीक्षित 'मिशन इम्पॉसिबल-7'चा ट्रेलर रीलिज झाला आहे. हा चित्रपट 14 जुलै 2023 रोजी अमेरिकेत प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी त्याची भारतातील प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. या अ‍ॅक्शन-स्पाय चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन ख्रिस्तोफर मॅक्वारी यांनी केले आहे. तब्बल 2 हजार 248 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला आहे. टॉमसमवेत या चित्रपटात विंग रहमेस, सिमोन पेग, रिबेका फर्ग्युसन आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर लीक

हॉलिवूड इंडस्ट्रीचा स्टार टॉम क्रूझचा 'मिशन इम्पॉसिबल 7' या चित्रपटाच्या ट्रेलरचे स्क्रिनिंग गेल्या महिन्यात आयोजित करण्यात आले होते. मात्र अद्याप अधिकृतपणे ते जाहीर करण्यात आलेले नाही. असे असूनही, 2 मिनिटांचा हा ट्रेलर शनिवारी अनेक ट्विटर हँडलवर प्रदर्शित करण्यात आला. तथापि, कॉपीराइट उल्लंघनामुळे ते नंतर सर्व ठिकाणांहून काढून टाकण्यात आले. चित्रपटाचा ट्रेलर कसा लीक झाला हे अद्याप समोर आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT