Latest

Mirror of the Sky : पृथ्वीतलावरील ‘मिरर ऑफ द स्काय’!

Arun Patil

सुक्रे-बोलिव्हिया : बोलिव्हियाला दोन राजधानी शहरे आहेत. यातील पहिले म्हणजे सुक्रे आणि दुसरे म्हणजे ला पाझ हे त्या देशातील राजकीय-व्यवस्थापकीय केंद्र. याच बोलिव्हियाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील मिठागर सालार दे ऊयुनी. या ठिकाणचे वेगळेपण म्हणजे तेथे पृथ्वी अगदी आरशाप्रमाणे भासते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथे आकाशाचे प्रतिबिंब झळकते आणि पृथ्वीचा आकाशाशी मिलाफ व्हावा, असा नजारा येथे दिसून येतो.

सोशल मीडियावर त्याची छायाचित्रे अनेकदा व्हायरल होत असतात. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. सालार दे ऊयुनी आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते आणि हे त्याचे एक छायाचित्र, असे यात नमूद केले गेले आहे. सालार दे ऊयुनी हे जगभरातील सर्वात मोेठे मिठागर म्हणूनही ओळखले जाते.

या ठिकाणी विस्तृत क्षेत्रात मिठाचे मोठमोठे ढीग आहेत. ज्यावेळी आसपासचे झरे ओव्हरफ्लो होतात, त्यावेळी येथे दूरपर्यंत पाणी भरते आणि त्यातून आकाशाचे प्रतिबिंब दिसते. हा नजारा बराच आश्चर्यकारक आणि अचंबित करणारा असतो. 8 सेकंदांचा एक व्हिडीओ यामुळे बराच व्हायरल झाला असून त्यात निळ्याशार आकाशाचे प्रतिबिंब कसे निसर्ग सौंदर्याची उधळण सहजपणे अधोरेखित होते. या ठिकाणाला 'मिरर ऑफ द स्काय' या नावानेही ओळखले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT