पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई पोलीस सहआयुक्तांना यशवंत माने या व्यक्तीने फोन करुन मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवू अशी धमकी दिली आहे. यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे आहे. तसेच या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे. (Mira Bhayandar )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई पोलीस दलाच्या सहआयुक्तांना मध्यरात्री दोन वाजता एक कॉल आला. हा कॉल यशवंत माने या व्यक्तीने केला होता. त्याने कॉल करत मुंबई पोलीस सहआयुक्तांना धमकी दिली की, मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणू. या फोननंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरु केली आहे. धमकी देणाऱ्या यशवंत याने "मीरा भाईंदरमध्ये बॉम्बस्फोट घडवू" या व्यतिरिक्त काहीही उल्लेख केलेला नाही. त्याने कोणाच्या सांगण्यावरुन धमकीचा कॉल केला की, त्याने स्वत: केला, कोणत्या भागातून केला याचा शोध मुंबई पोलिस घेत आहेत.
हेही वाचा