पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे आज (दि.15) दुपारी 1.48 वाजता 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, मणिपूरच्या Manipur Earthquake उखरुलमध्ये आज भूकंपाचे धक्के बसले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 मोजली गेली. येथे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. Madhya Pradesh Earthquake
मणिपूरमध्ये Manipur Earthquake आज (शुक्रवार) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी ६.५६ वाजता मणिपूरच्या उखरुलमध्ये भूकंप झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 90 किलोमीटर खोल होते. यावेळी घाबरलेले लोक घराबाहेर पडले. सध्या तरी कुठलेही नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.