मेट्रोचा 'डबल डेकर व्हायाडक्ट 
Latest

मेट्रोचा ‘डबल डेकर व्हायाडक्ट’ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये; एकाचवेळी दोन मार्गांवर वाहतूक

अमृता चौगुले

नागपूर.पुढारी वृत्‍तसेवा : संत्रानगरी म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराचे नाव पुन्हा एकदा 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवण्यात आले आहे. 3.14 किमी लांब असा विमानतळ ते अजनी परिसराला जोडणाऱ्या मेट्रो डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महा मेट्रो यांच्या पथकाने नागपुरातील महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसह एकाच स्तंभावर समर्थित सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये समाविष्ट केले आहे. याबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एनएचएआय आणि महा मेट्रो टीमचे अभिनंदन केले आहे. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या प्रकल्पाला एशिया बुक आणि इंडिया बुककडून आधीच रेकॉर्ड मिळाले आहे. महाराष्ट्रातील नागपूरमधील वर्धा रोडवरील 3.14 किमी लांबीचा दुहेरी मार्ग 5 मार्च 2019 रोजी मेट्रो रेल्वे वाहतुकीसाठी आणि 13 नोव्हेंबर 2020 रोजी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

'डबल डेकर व्हायाडक्ट'ची वैशिष्ट्ये 

वर्धा रोडवर बांधलेल्या या 3.14 किलोमीटर लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्टमध्ये एकूण तीन मेट्रो स्टेशन छत्रपती नगर, जयप्रकाश नगर आणि उज्ज्वल नगरचा समावेश आहे. या स्थानकांची अभियांत्रिकी विचार प्रक्रिया, संकल्पना, रचना आणि अंमलबजावणी हे आव्हानात्मक काम होते. जेव्हा प्रकल्पाची सुरुवातीला कल्पना करण्यात आली.

हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल्वेचे संरेखन वर्धा रोडवरील त्याच सध्याच्या महामार्गावर होते. मध्यभागी प्रस्तावित पर्यायी ठिकाणी स्वतंत्र खांब होते. नंतर, त्याचा आढावा घेण्यात आला आणि महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वे एकत्रित करून डबल डेकर व्हायाडक्ट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा डबल-डेकर व्हायाडक्ट पहिल्या स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि दुसऱ्या स्तरावर मेट्रो रेल्वे वाहून नेतो. ज्यामुळे जमिनीच्या पातळीवर विद्यमान महामार्गासह त्रिस्तरीय वाहतूक व्यवस्था बनते. याशिवाय, प्रकल्पामुळे भूसंपादन टाळण्यात मदत झाली आहे. त्यामुळे जमिनीची किंमत वाचली आहे, तसेच बांधकामाचा वेळ आणि प्रकल्पाचा खर्चही कमी झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT