गीतिका श्रीवास्‍तव.(संग्रहित छायाचित्र) 
Latest

कोण आहेत Geetika Srivastava? ज्‍यांच्‍यावर असेल पाकिस्‍तानमध्‍ये मोठी जबाबदारी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय परराष्‍ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी गीतिका श्रीवास्‍तव (Geetika Srivastava ) यांची पाकिस्‍तानमधील उच्चायुक्तपदी (High Commissioner) नियुक्‍ती झाली आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने प्रथमच सर्वाधिक तणावाचे संबंध असणार्‍या शेजारचा देशातील उच्चायुक्तपदी महिला अधिकार्‍याची नियुक्‍ती केली आहे. गीतिका श्रीवास्‍तव या एम सुरेश कुमार यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

२०१९ मध्‍ये भारत सरकारने जम्‍मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द केला. यानंतर पाकिस्‍तानने सीमेपलीकडून दहशतवादी संबंधित कारवाया सुरुच ठेवल्‍या. दोन्‍ही देशांमधील संबंध कमालीचा तणाव निर्माण झाला. यानंतर दोन्‍ही देशांमधील तणाव कायम राहिला आहे. इस्लामाबादमधील शेवटचे भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया होते. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने उच्चायुक्ताचा दर्जा कमी केला होता. आता गीतिका श्रीवास्‍तव या इस्‍लामाबादमध्‍ये भारताच्‍या उच्चायुक्त म्‍हणून काम पाहणार आहेत.

Geetika Srivastava : पाकिस्‍तानमधील भारताच्‍या पहिल्‍या महिला उच्चायुक्त

गीतिका श्रीवास्तव या २००५ बॅचच्‍या भारतीय परराष्‍ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत. त्‍यांनी २००७ ते २००९ या कालावधीत चीनमधील भारतीय दूतावासातही काम केले. त्‍यांनी कोलकाता येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय आणि हिंद महासागर क्षेत्र विभागाच्या संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.

भारताने महिला मुत्सद्दींना पाकिस्तानात पाठवले आहे; पण उच्च पदांवर नाही. पाकिस्तानमध्ये सेवा करताना स्वतःची आव्हाने येतात. काही वर्षांपूर्वी इस्लामाबादला भारतीय मुत्सद्दींसाठी 'फॉमिली पोस्टिंग' म्हणून घोषित करण्यात आले होते. यामुळे स्त्रियांना असाइनमेंट घेणे कठीण झाले. कारण त्यांचे जोडीदार आणि मुले त्यांना सोबत घेऊ शकत नाहीत. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत भारताने पाकिस्‍तानमध्‍ये २२ उच्चायुक्तांची नियुक्‍ती झाली आहे. श्री प्रकाश हे पाकिस्‍तानमध्‍ये भारताचे पहिले उच्चायुक्त होते.

पाकिस्तान सरकारने साद वरैच यांची नवी दिल्लीतील नवीन प्रभारी म्हणून निवड केली आहे. ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात अफगाणिस्तान, इराण आणि तुर्की डेस्कचे महासंचालक म्हणून काम करत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT