Latest

Martina Navratilova : माजी टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा दुहेरी कॅन्सरच्या विळख्यात

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोव्हा 12 वर्षांनंतर पुन्हा कॅन्सरच्या विळख्यात आली आहे. यावेळी तिला दुहेरी फटका बसला आहे. नवरातिलोव्हाला आता स्तन आणि घश्याचा कर्करोग झाला आहे. 66 वर्षीय या टेनिसपटूला 2010 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. त्यानंतर तिने सहा महिन्यांत स्टेज कॅन्सरवर मात केली होती. Martina Navratilova

18 वेळची ग्रँडस्लॅम एकेरी चॅम्पियन मार्टिना नवरातिलोव्हा म्हणाली, हा दुहेरी धक्का गंभीर आहे. परंतु नक्की तो बरा होईल. मी अनुकूल निकालाची वाट पाहात आहे. नवरातिलोव्हाला फोर्ट वर्थ टेक्सास येथे नोव्हेंबरमध्ये घशाचा त्रास जाणवला. यानंतर तिची बायोप्सी करण्यात आली, त्यामध्ये घशाच्या कर्करोगाची माहिती मिळाली. चाचणीदरम्यान तिलाही ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले. आता तिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कॉमेंट्री करता येणार नाही. ही स्पर्धा तिला दुरूनच पाहावी लागणार आहे. Martina Navratilova

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT