Latest

पुण्यातील विवाहितेवर मिरजेत सामूहिक बलात्कार; सातजणांना अटक

दिनेश चोरगे

मिरज; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका 23 वर्षीय विवाहितेवर मिरजेत सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. तसेच पीडित तरुणीला संशयितांनी कर्नाटकात चार लाखांना विकले होते. तरुणीने तेथून सुटका करवून घेऊन पुणे गाठून फिर्याद दाखल केली. हा गुन्हा महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला आहे.

पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे. महंमदगौस ऊर्फ सरफूशेरखान फकीर (वय 20), संतोष बाबू नाशिककर ऊर्फ इरम महंमदगौस फकीर (26) जुबेद ऊर्फ कपाला शब्बीर शेख (24), खालीद मुबारक कोरबू (20), महंमदहुसेन महंमदगौस शेख (31), अबूजर फारूख जमादार (18, ख्वॉजा वस्ती, मिरज) व महंमद साजीद शमशुद्दीन मुल्ला (20, दर्गा चौक, मिरज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील विवाहिता आई-वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने कराडला निघाली होती. तिला रेल्वेत झोप लागली. रेल्वे मिरज जंक्शनवर आल्यानंतर तिला जाग आली. परत कराडला जाण्यास लवकर रेल्वे नसल्यामुळे ती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आली. संशयितांनी तिला झुडपात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रेल्वे ब्रीजजवळील कामगाराच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये कोंडून घातले. तिथे संशयितांपैकी एकाने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला जमखंडी येथे नेले. तिथेही पुन्हा सामूहिक बलात्कार केला. कर्नाटकातील गंगा, मुक्ता, अण्णा व ब्रातेश या चौघांकडे तिला चार लाखाला विकले. कर्नाटकातील या संशयितांनी तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले.

दरम्यान, पीडित विवाहितेच्या नातेवाईकांनी, पुण्यात ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. कर्नाटकमधील ज्या व्यक्तीला या विवाहितेला विकण्यात आले होते, त्या व्यक्तीला तिच्याविरुद्ध घडलेला प्रकार लक्षात आला. त्या व्यक्तीने मिरजेतील ख्वॉजा बस्तीजवळील संशयितांकडे विवाहितेला सोडले. विवाहिता पुण्यात गेली आणि तेथे पोलिसांकडे तक्रार दिली. पुणे पोलिसांनी झिरो नंबरने गुन्हा दाखल करून तो मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT