Latest

Closing Bell : ‘विक्री’चा मारा वाढला, सेन्सेक्समध्‍ये ३५४ अंकांची घसरण, आज शेअर बाजारात काय घडलं?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांचे पडसाद आज (दि.५) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी शेअर बाजारावर उमटले. बाजाराते चढ-उतार अनुभवला. सकाळच्या व्‍यहारात बेंचमार्क निर्देशांकांची सुरुवात डळमळीत झाली. यानंतर तो सावरला मात्र नफेखोरीच्‍या आमिषाने विक्रीचा मारा वाढला आणि ट्रेडिंगमध्‍ये सेन्‍सेक्‍ससह निफ्‍टीही घसरला  अखेर प्रमुख बाजार निर्देशांक लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 354 अंकांनी घसरून 71,731 वर आला. निफ्टीही 82 अंकांनी घसरून 21,771 वर बंद झाला. दरम्‍यान, शुक्रवार, २ फेब्रुवारी राेजी सेन्सेक्स 440 अंकांनी वधारत 72,085 वर बंद झाला होता.

बाजारावर विक्रीचा दबाव, सेन्सेक्ससह निफ्‍टीतही घसरण

जागतिक बाजारातून मिळालेल्‍या संमिश्र संकेतांमुळे आज (दि.५) आठवड्याच्‍या पहिल्‍या दिवशी शेअर बाजारातील व्‍यवहारांना सावध सुरुवात झाली. सेन्सेक्स 72000 आणि निफ्टी 21800 च्या पातळीवर व्यवहार करत होता. ऑटो, रियल्टी आणि फार्मा पॅक आघाडीवर राहिले तर बँकिंग शेअर्संनी घसरण अनुभवली. दिवसभरात ते हिरव्या रंगात व्यापार करण्यासाठी सावरले. सेन्सेक्सने 72,269.12 चा उच्चांक गाठला, तर निफ्टी 21,964.30 वर पोहोचला.दुपारी 2 वाजता, सेन्सेक्स 191.36 अंकांनी किंवा 0.27% वाढून 72,276.98 वर आणि निफ्टी 87.25 अंकांनी किंवा 0.4% वाढून 21,941.05 वर होता. मात्र अखेरच्‍या सत्रात गुंतवणूकदारांनी नफा कमाईला प्राधान्‍य दिले. त्‍यामुळे  बाजाराने दिवसाची नीचांकी पातळी गाठली. सेन्सेक्स सुमारे 450 अंकांनी घसरला आणि 71,700 च्या खाली घसरला. निफ्टीही 100 अंकांनी घसरून 21,750 च्या खाली आला. अखेर आज  बाजारात व्‍यवहार बंद हाेताना सेन्सेक्स 354 अंकांनी घसरून 71,731 वर आला. निफ्टीही 82 अंकांनी घसरून 21,771 वर बंद झाला.

बॅकिंग क्षेत्रातील शेअर्सची विक्री, पेटीएमची घसरण सुरुच

बँकिंग, एफएमसीजी, आयटी आणि मीडिया क्षेत्रांसह प्रमुख बाजार निर्देशांकांमध्ये विक्री झाली, तर ऑटो आणि फार्मा क्षेत्रामध्ये जोरदार खरेदी नोंदवली गेली. बाजाराची सुस्‍त वाटचाल सुरु असताना टाटा मोटर्सचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तर बँकिंग क्षेत्रात विक्री होत आहे. SBI सर्वाधिक तोट्यात आहे. पेटीएमचे शेअर्स आजही घसरले आहेत. दरम्‍यान. डॉलरच्या तुलनेत रुपया 12 पैशांनी कमजोर झाला आहे. पेटीएमचे शेअर्स सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान 10% घसरले. गेल्या तीन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 42% ने घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे 20,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी घसरला

अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी कमी होऊन 83.02 रुपयांवर आला.

साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक ते आठ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये केएम शुगर मिल्स लिमिटेड (7.42 टक्के), विश्वराज शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड (5.27 टक्के), कोठारी शुगर्स अँड केमिकल्स लिमिटेड (4.79 टक्के), त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (4.46 टक्के), उगर शुगर वर्क्स लिमिटेड (3.23 टक्के), सिंभाली यांचा समावेश आहे. शुगर्स लि. (3.07%), पोन्नी शुगर्स (इरोड) लि. (2.33%), बजाज हिंदुस्तान शुगर लि. (2.25%), शक्ती शुगर्स लि. (1.34%) आणि दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लि. (1.32%) ) सर्वाधिक नफा मिळवणारे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT