चला हवा येऊ द्या 
Latest

Marathi Show : ‘चला हवा येऊ द्या’ चा अलविदा, पुन्हा परतणार शो

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इतिहास घडवला ज्यांनी, सलग १० वर्ष लोकांना हसवलं ज्यांनी, कसे आहात हसताय ना असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात लोकांचं मन जिंकलं तो लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आणि ती लाडकी टीम आता १७ मार्चपासून विश्रांती घेतेय. पण परत येण्यासाठी. कारण गेली १० वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. पण निराश होऊ नका कारण एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या त्याच लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे.

या अखेरच्या भागात झी मराठी परिवारात दाखल झालेले आणि नव्याने दाखल होणाऱ्या मालिकांचे म्हणजेच 'पारू', 'शिवा', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'नवरी मिळे हिटलरला'चे प्रमुख कलाकार 'चला हवा येऊ द्या' च्या टीम सोबत आपल्याला मंचावर डान्स आणि विनोदाची आतषबाजी करताना दिसणार आहेत.

'चला हवा येऊ द्या'च्या या पर्वाचा शेवटचा भाग रविवार १७ मार्च रात्री ९.३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT