Santosh Chordia  
Latest

Santosh Chordia : मराठी विनोदवीर संतोष चोरडिया यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकपात्री कलाकार आणि विनोदवीर संतोष चोरडिया ( Santosh Chordia ) यांचे हदयविकाराच्या झटक्याने आज बुधवारी (दि. १३) रोजी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे. त्याचा निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या 

'हास्यसम्राट' आणि 'एम 2 जी 2' या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरने घेतलेल्या मुलाखतीतून ते प्रकाश झोतात आले. 'दुसरी गोष्ट', 'कँपँचिनो ', ' दगडाबाईची चाळ ' , 'प्रेमा ', 'सरगम' यासारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या. 'जीना इसी का नाम है' आणि 'फुल २ धमाल' या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरणही त्यांनी केलं आहे. रंगभूमी , दूरचित्रवाणी आणि चित्रपट या क्षेत्रात त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे.

देशासोबत त्यांनी लंडन ,इस्राइल, ओमान येथील चाहत्यांना 'हसवा हसवी' या एकपात्री प्रयोगाने खळखळून हसविले. या कलेसोबत अनाथ, अपंग, दृष्टीहीन, वृध्द , मूकबधिर आणि कर्करोग, एचआयव्ही अशा रूग्णांना सामाजिक संस्था आणि रुग्णालयांमध्ये विना मोबदला मिळवून देणारे अविरत काम त्यांनी केले. यंदाचा त्यांना विनोदोत्तम फांउडेशनतर्फे विनोदवीर पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. यानंतर संतोष चोरडिया ( Santosh Chordia ) यांनी २०२१ मध्ये' रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन ' स्थापनाही केली होती. ते या संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT