Latest

Maratha Andolan : कोनशिलेवरील छगन भुजबळांचे नाव फोडले

गणेश सोनवणे

उगांव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; राज्यात मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. त्यात मराठा नेत्यांसह ओबीसी नेत्यांवरही मराठा समाजाचा रोष आहे. त्यात छगन भुजबळ हे ओबीसीचे बडे नेते असल्याने व मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास त्यांचा विरोध असल्याने त्यांना टार्गेट केले जाते आहे. अगदी काल छगन भुजबळांचा बालेकिल्ला व मतदारसंघ असलेल्या येवल्यातही कार्यालयातील भुजबळांच्या फोटोंची तोडफोड झाली.

या आंदोलनाचे लोण आता खेडो-पाडी जाऊन पोहोचले असून निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द येथेही  ग्रामपंचायतीचे संगणक हाँल आधुनिक स्वच्छतागृह व संरक्षक भिंतवरील बांधकामाच्या उद्घाटनाची (दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी लावलेली कोनशिला आंदोलकांनी फोडली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव व पद या कोनशिलेवरुन आंदोलकांनी काढलं आहे.  विशेष म्हणजे सारोळे खुर्द हे गांव छगन भुजबळ यांचे मतदारसंघातील गांव आहे. त्यामुळे भुजबळांच्या मतदार संघात अशाप्रकारे त्यांच्यावर रोष व्यक्त होत असल्याने राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT