Latest

Maovadi : कुख्यात माओवादी हिडमा याचा खात्मा, तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर चकमक; ६ जवानही जखमी

backup backup

हैदराबाद : Maovadi : वृत्तसंस्था ४५ लाख रुपयांचे इनाम असलेल्या मडवी हिडमा या माओवादी कमांडरला सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या पथकाने गोळ्या घालून ठार केले. तेलंगणा – छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत हिडमा मारला गेला. या चकमकीत सुरक्षा दलाचे सहा जवान जखमी झाले. यावेळी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला.

माओवाद्यांच्या मध्यवर्ती समितीवर असलेला ४५ वर्षीय हिडमा गनिमी काव्याच्या हल्ल्यासाठी कुख्यात होता. १९९६ पासून तो माओवादी चळवळीत सक्रिय होता. घातक हल्ल्यांमुळे तो संघटनेत लवकरच वरच्या पदावर पोहोचला. त्याच्या घातक कारवायांमुळे महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगडच्या पोलिसांना तो बऱ्याच काळापासून हवा होता.

अनेक मोहिमांत तो सुरक्षा दलांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. बिजापूर आणि सुकमा येथे सुरक्षा दलांवर हल्ले चढवण्यात त्याचा सहभाग होता. त्याच्या डोक्यावर ४५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

Maovadi : कारवाईदरम्यान सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनच्या जवानांनी माओवाद्यांना घेरले. त्यांच्यात आणि सीआरपीएफ यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. अटीतटीच्या टप्प्यात हेलिकॉप्टरच्या मदतीने माओवाद्यांवर गोळीबार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यात आलमगुंडा कॅम्पपासून १२ ते १५ कि.मी. अंतरावरील जंगलात कोब्रा बटालियनचे जवान शोधमोहीम राबवत असताना माओवाद्यांनी या पथकावर हल्ला चढवला. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच माओवाद्यांनीही पत्रक प्रसिद्धीला दिलेले नाही.

तेलंगणा व छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलात माओवाद्यांसोबत नेमकी कोठे चकमक झाली याची माहिती मिळाली नसली, तरी छत्तीसगड पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यालयाने जारी केलेल्या एका संक्षिप्त पत्रकात या चकमकीत सुरक्षा दलाचे सहा कर्मचारी जखमी झाल्याचे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT