Latest

ADITYA L-1 : सूर्याच्या अभ्यासातून उलगडणार आता अनेक महत्त्वाची रहस्ये!

Arun Patil

वॉशिंग्टन : सूर्य असा तारा आहे, जो पृथ्वीपासून बराच जवळ आहे. अन्य घटकांच्या तुलनेत या तार्‍याचा अभ्यास करणे अधिक सोपे ठरू शकते. ADITYA L-1

'चांद्रयान-3' च्या यशस्वितेनंतर भारताने आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रवाना होणार्‍या 'आदित्य एल-1' मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सूर्याचा आणखी सखोल अभ्यास करता येईल आणि त्यातून अनेक महत्त्वाची रहस्ये उलगडता येतील, अशी भारताची महत्त्वाकांक्षा आहे. 'आदित्य एल-1' ADITYA L-1 मोहिमेला श्रीहरिकोटामधील स्पेस सेंटरमधून पीएसएलव्ही यानाच्या माध्यमातून सुरुवात केली जाणार आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर या मोहिमेच्या क्रूझ फेजला प्रारंभ होईल. सूर्याचे परीक्षण करत असताना मिल्की वे मधील अन्य ग्रहांची देखील अधिक माहिती मिळू शकते.

सूर्याच्या आवरणात होणार्‍या विस्फोटक प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील अंतराळ क्षेत्रात अनेक बदल घडू शकतात. ADITYA L-1 काही वेळा स्पेसक्राफ्ट, उपग्रहावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सूर्यावरील अशा प्रकियांची आगाऊ माहिती मिळाली, तर काही सावधगिरीची पावले उचलता येऊ शकतात.

सूर्यावरील अनेक मॅग्नेटिक व थर्मल प्रक्रिया असाधारण स्तरावरील असतात. त्यामुळे, त्या कक्षेत राहून त्यावर संशोधन करणे बरेच जटिल, आव्हानात्मक ठरत आले आहे. मात्र, सध्या अंतराळ मोहिमांचे प्रमाण वाढत असताना अवकाशाचे हवामान कसे आहे, याची नेमकी माहिती उपलब्ध असणे आवश्यक ठरते. त्या पार्श्वभूमीवर, ही पुढील मोहीम ADITYA L-1 विशेष महत्त्वाकांक्षी ठरू शकते, असा संशोधकांचा होरा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT