विमान प्रवास करताना अनेक सुचनांची यादी समोर येते. रोजच्या जीवनातील अनेक साध्या वाटणाऱ्या अशा वस्तुही आहेत ज्या विमानप्रवासात सोबत बाळगण गुन्हा आहे. या वस्तू शक्यतो घेऊन जाऊ नये. नेल्यास त्या नेण्याची परवानगी विमान प्रशासनाकडून दिली जात नाही.
त्यापैकीच एक आहे नारळ. हो हे खरं आहे. विमान प्रवासात तुम्ही नारळ सोबत बाळगला तर विमान कंपनी तुम्हालाच प्रवासातून नारळ देऊ शकते. याला ही खास कारण आहे. दुबई सहित अनेक एयरलाईन्स आपल्या प्रवाशांना नारळ बाळगण्यास सक्त मनाई करतात.
याला कारण असे की नारळाच्या ज्वलनशील गुणधर्मामुळे तो आग पकडण्याची शक्यता कैक पटीने वाढते. नारळाच्या तैलीय गुणधर्मही याला कारणीभूत आहे. त्यामुळे विमान प्रवासात नारळ बाळगण हे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.
याशिवाय विमानप्रवासात बंदूक, इतर ज्वलनशील पदार्थ, धारदार वस्तु स्वसंरक्षणासाठी वापरली जाणाऱ्या वस्तू, मादक पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे.