Latest

Manoj Jarange Jalna Rally : दंगली घडवण्याचं काम भुजबळ करतायत, मनोज जरांगेंचा घणाघात

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Manoj Jarange Jalna Rally : 'छगन भुजबळ हे दंगली घडवण्याचं काम करत आहेत. त्यांनी महापुरुषांच्या जाती काढल्या. घटना पायदळी तुडवणारा मंत्री म्हणजे भुजबळ,' अशी घणाघाती टीका मनोज जरांगे यांनी केली. ते जालना येथील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी 'मराठा आरक्षण ओबीसीमधूनच मिळवणार आहे, काय करायचे ते करा,' असे आव्हानही दिले.

जरांगे पुढे म्हणाले की, 'मला, मराठ्यांना दुश्मन मानत असाल तर मी भीत नाही. २४ डिसेंबरच्या आत आरक्षण दिले नाही तर तुमची गाठ मराठ्यांशी आहे. सरकारला करायची ती सगळी मदत केली आहे. दोन दिवसात आंतरवाली येथील गुन्हे मागे घ्या. एका महिन्यात राज्यभरातले गुन्हे मागे घ्या,' असे अशी मागणी राज्य सरकारला केली.

'भुजबळांनी ओबीसींमधील जातींवरही अन्याय केला आहे. खालच्या जातीतील लोकांना हे आरक्षणाचा फायदा होऊ देत नाहीत. ओबीसी महामंडळातले 80 टक्की भुजबळांनी एकट्याने खाल्ले. त्यांनी महाराष्ट्र सदन खाल्लं. ते सगळ्या दुनियेचं खातात,' असा गंभीर आरोपही जरांगेंनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT