Latest

मनमाडचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज कोसळला, वाहतुक ठप्प

गणेश सोनवणे

मनमाड पुढारी वृत्तसेवा : पुणे -इंदौर महामार्गांवर असलेला मनमाड शहरातील रेल्वे ओवरब्रिजच कोसळला असून महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे. आज पहाटे ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड शहरातून जाणारा पुणे -इंदौर महामार्गांवरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग आज पहाटे कोसळला.  त्यामुळे या महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नगर शिर्डी कोपरगाव वरुन येणारी वाहतूक येवल्यावरुन लासलगाव मार्गे वळवण्यात आली आहे.

या उड्डाण पुलाच्या खालून रेल्वे तर वरून वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे वाहतुकीसाठी हा ब्रिज महत्वाचा मानला जातो. सुदैवाने ब्रिजचा भाग रेल्वे रुळावर कोसळला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा ब्रिज जुनाट आणि कमकुवत झालेला असून या अगोदर एक वर्षापूर्वी देखील अशीच घटना घडली होती. मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनातर्फे पाहिजे तेवढी दक्षता घेण्यात आली नाही, त्यामुळे आजची घटना घडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT