पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण मनी लॉड्रिंग प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी (दि.१२) झालेल्या सुनावणी दरम्यान दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणात न्यायालयाने CBI, ED कडे मागितले उत्तर मागितले होते. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ईडी आणि सीबीआयचा युक्तिवाद केला. यावेळी सिसोदीयाच मद्य धोरणाचे मुख्य आर्किटेक्ट असल्याचा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाने केला. दरम्यान सीबीआयचे वकील पुढील तारखेला युक्तिवाद सुरू ठेवणार असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी २० एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Manish Sisodia)
तुरुंगात असलेले मनीष सिसोदिया यांचे वकील विवेक जैन यांनी आजच या खटल्याची सुनावणी व्हावी; यासाठी आग्रह धरला होता. जेणेकरून दोन्ही जामीन याचिकेवरील केवळ निकाल आज राखून ठेवता येतील. परंतु न्यायालयाने सिसोदीयांच्या वकीलांची विनंती नाकारली आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी नियमित ठेवल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यानंतर हे पूर्णपणे अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया विवेक जैन यांनी दिली आहे. (Manish Sisodia)
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात आज (दि.१५) मद्य धोरण प्रकरणासंबंधित दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ईडीकडून विशेष वकील जोहेब हुसेन तर सिसोदिया यांच्यातर्फे वकील विवेक जैन हजर होते. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. दरम्यान सिसोदीयांच्या जामीन अर्जावर शनिवारी २० एप्रिल रोजी नियमित सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. (Manish Sisodia)
आम्ही सर्व कारणांसह एक नोट सादर करत आहे. या प्रकरणातील सुनावणी ६ ते ८ महिन्यात होणे शक्य नाही. तरीदेखील जे पण आणि जसे पण आहे तसे स्पीडमध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या प्रकरणात कोणताही समानतेचा आधार लागू होत नाही, असे म्हणत मनीष सिसोदिया हेच या धोरणाचे मुख्य शिल्पकार असल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला आहे.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीच्या वतीने युक्तिवाद करताना वकील जोहेब हुसेन म्हणाले, दिल्ली मद्य धोरम घोटाळा प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात त्यांचाच सहभाग होता. हे दस्तऐवज सिसोदिया यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांना सुपूर्द केले. यावरही आमच्याकडे अरविंद केजरीवाल यांचे विधान असल्याचे ईडीने म्हटले आहे. तर पुढे दक्षिण ग्रुपची मिटींग झालेली हॉटेल ओबेरॉयची बिले आमच्याकडे असल्याचे ईडीने युक्तीवादादरम्यान म्हटले आहे. यावेळी या प्रकरणातील सहआरोपी देखील उपस्थित होते. संदर्भात पुष्टी करणरी विधाने देखील आमच्याकडे आहेत, असा ईडीने न्यायालयापुढे युक्तिवाद केला आहे.