पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Bomb Blast : प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील गांधी सर्कलमध्ये बुधवारी संध्याकाळी स्फोटक यंत्राचा स्फोट झाल्यानंतर बॉम्बस्फोट झाला. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास झालेला हा स्फोट गांधी पुतळ्याच्या प्लॅटफॉर्मच्या आत लावलेल्या इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसचा (आयईडी) असल्याचा संशय आहे. जवळपास उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका जोरात होता की, गांधी सर्कलपासून 2 किमी अंतरावर असलेल्या विनो बाजारपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. या स्फोटामुळे किती जखमी झाले किंवा मृत्यू झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पुढील तपशीलाची प्रतीक्षा आहे.