पिंपळे गुरव : 'पाहू द्या पाहू द्या, माझ्या विठ्ठलाचे मुख भागीलीसी भूक माझे डोळा' अशी तुकाराम महाराजांची अभंग गाऊन गेल्या पंचवीस वर्षांपासून संत तुकाराम महाराजांचे पात्र नवी सांगवीतील प्रकाश घोरपडे साकारत आहेत. हुबेहूब संत तुकाराम महाराज यांच्या सारखा चेहरा प्रकाश घोरपडे याना लाभल्याने स्थानिकातून त्यांना तुकाराम महाराजच म्हटले जात आहे.
घोरपडे मुळचे सातारा गावच्या मंगळपूर गावचे. नवी सांगवीत गेल्या पस्तीस वर्षांपासून राहतात. प्रकाश घोरपडे यांना घरातून अध्यात्मिक वारसा लाभलेला असल्यामुळे संत तुकाराम महाराजांची गोडी लागली. पुढे त्यांनी तुकाराम महाराजच चरित्र वाचण्यास सुरूवात केली आणि हळूहळू तुकाराम महाराजांचे विचारांचे कार्यक्रमातून प्रबोधन करू लागले. प्रकाश घोरपडे खासगी नोकरी करत आहेत. 2005 साली तुकाराम महाराजांचे पात्र साकारत प्रकाश घोरपडे यांनी देहूत नावेतून तुकाराम महाराजांच्या गाथा नागरिकांना वाटल्या आणि तुकाराम महाराजचे अभंग गायीले.
पांढरी पगडी, धोतर आणि पांढरा झालर असलेला झब्बा, कपाळावर गंध आणि हातात चिपळ्या असा पेहराव करून प्रकाश घोरपडे जवळपास गेली पंधरा वर्ष आषाढी एकदशीनिमित्त निघालेल्या तुकाराम महाराज पालखीसोबत देहू ते निगडीपर्यंत पायी प्रवास करतात.
सार्वजनिक भजन सप्ताहात तुकाराम महाराज अभंग वाणीचे प्रबोधन करतात. तरुण वर्गाने तुकाराम गाथाचे वाचन करावे आणि तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करून समाज कार्य करावे, असे प्रकाश घोरपडे आपल्या विविध कार्यक्रमांतून नागरिकांना सांगतात.
हेही वाचा: