श्रीगोंदा: पुढारी वृत्तसेवा
किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत श्रीगोंदा शहरातील सचिन विठ्ठल जाधव वय-३५ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सागर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. २२ मे रोजी मयत सचिन जाधव हा शनी चौक परिसरात असणाऱ्या एका मस्जिदसमोर आला असता आरोपी अक्षय बलभीम गायकवाड, ऋतीक बाबु जाधव, विशाल झुंबर गायकवाड, समीर काझी, बापु बाबा माने यांनी त्यास अडवत तू आमच्या कैकाडी गल्लीत दारु पिऊन यायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली. छातीवर, पोटात जोर जोरात लाथांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने पाठीवर, उजव्या पायाच्या खुब्यावर मारहाण करुन जखमी केले. जखमी सचिन जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान २६ मे रोजी सचिन जाधव याचा मृत्यू झाला.
सागर जाधव यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले करत आहेत.
https://youtu.be/m5yyfqkYqY4