Latest

Mamata Banerjee : भाजपाविरोधी मोट बांधण्याच्या ममता बॅनर्जींच्या हालचालींना वेग; स्टॅलिन, के. चंद्रशेखर राव यांच्‍यासह उद्धव ठाकरेही सक्रीय

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्‍चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला थेट टक्कर देत पराभव स्वीकारायला लावल्याबद्दल देशातील विरोधी पक्षांचा चेहरा बनलेला ममता बॅनर्जी विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र करून एक नवी राजकीय फळी बनविण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन रविवारी रात्री दिली. (Mamata Banerjee)

स्टॅलिन यांनी ट्विट करून सांगितलं की, "ममता बॅनर्जी यांनी फोनवरून माझ्याशी चर्चा केली. त्यांनी विविध राज्यांच्या राज्यपालांकडून अधिकारांचा गैरवापर केला जात आहे. तसेच त्यांच्या घटनात्मक मर्यादा ओलांडली जात आहे. त्यांनी विरोधी पक्षातील सर्व मुख्यमंत्र्याची बैठक घेण्याचा सल्ला दिला. मी त्यांना विश्वास देऊ शकलो की, डीएमके राज्यांच्या स्वायत्तेसाठी तुमच्याबरोबर आहोत. दिल्लीमध्ये लवकरच भाजपविरोधी पक्षातील मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडणार आहे", अशीही माहिती त्यांनी दिली.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितलं की, लवकरच महाराष्ट्रात जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची समक्ष भेट घेणार आहेत. त्याचबरोबर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हैदराबादच्या दौऱ्यावर येणार आहे, तेव्हा त्यांचीही भेट घेतली जाणार आहे, अशी माहिती के. चंद्रशेखर राव यांनीदिली. (Mamata Banerjee)

असं असंली तरी, केसीआर यांनी उघडपणे असं सांगितलेलं नाही की, या भेटी भाजपविरोधी मोट बांधण्यासाठीच्या आहेत किंवा त्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पण, त्यांनी हे नक्की सांगितलं आहे की, भाजपविरोधात जर राजकीय मोट बांधली जात असेल तर त्यात पहिल्यांदा केसीआर आघाडीवर असेल.

केसीआर म्हणाले की, "ममता बॅनर्जी यांनी माझ्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मला बंगाल येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मात्र, त्यांनी  हैदराबाद येण्याचंही त्यांनी कबूल केलं. आमच्या चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरेदेखील महाराष्ट्रात येण्याची माझी वाट पाहत आहेत. मला मुंबईला जायचं आहे", अशी माहिती केसीआर यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT