मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलीस दलात कार्यरत पोलीस निरीक्षकांसह सहायक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत सर्वसाधारण बदल्या केल्यानंतर शनिवारी पून्हा एकदा मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले. मुंबईत 43 सहायक आयुक्तांना नवीन नियुक्त्या देण्यात आल्या असून 43 पोलीस निरीक्षकांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती देऊन नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच, सध्या कार्यरत असलेल्या 22 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात, नंदकुमार गोपाळे यांना भायखळा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना सहायक पोलीस आयुक्तपदी बढती मिळालेल्या 18 अधिकार्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. यात घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांच्याशी आपल्याला बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करत नसल्याने झालेल्या वादानंतर एका अधिकार्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणाची चौकशी सुरु असतानाच डहाके यांची देवनार विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राजू कसबे यांची वाहतूक विभाग, विजय बेलगे यांची मुख्यालय-दोन, प्रदीप खुडे यांची मुख्यालय-एक, सुहास कांबळे यांची खेरवाडी विभाग, संजय डहाके यांची देवनार विभाग, सुनिल कांबळे यांची संरक्षण व सुरक्षा विभाग, सुनिल चंद्रमोरे यांची गुन्हे शाखा, सीराज इनामदार, सोमेश्वर कामठे आणि दिपक पालव यांची विशेष शाखा-एक, श्रविंद्र दळवी यांची मुलुंड विभाग, शशिकांत भंडारे यांची नेहरु नगर विभाग, शेखर डोंबे यांची वाहतूक विभाग, मनोज शिंदे यांची सशस्त्र पोलीस दल वरळी, महेश मुगुटराव यांची सांताक्रुझ विभाग, भूषण बेळणेकर यांची वांद्रे विभाग, कुमुद कदम यांची सशस्त्र पोलीस दल नायगाव आणि झुबेदा शेख यांची संरक्षण व सुरक्षा विभागात नेमणूका करण्यात आल्या.
सहायक पोलीस आयुक्तपदी बढती मिळून मुंबईत नियुक्ती मिळालेल्या 10 अधिकार्यांच्याही नेमणूका करण्यात आल्या आहेत. यात माया मोरे यांची यलोगेट विभाग, शशिकरन काशीद यांची कुलाबा विभाग, शशिकांत भोसले यांची अंधेरी विभाग, संदीप भागडीकर यांची दादर विभाग, लक्ष्मण डुंबरे यांची गावदेवी विभाग, जॉर्ज फर्नांडीस यांची वाकोला विभाग, चंद्रशेखर सावंत यांची आग्रीपाडा विभाग, जितेंद्र आगरकर यांची भांडुप विभाग, दत्तात्रय ढोले यांची दिंडोशी विभाग आणि शोभा पिसे यांना ताडदेव विभागाची जबाबदारी देण्यात आली.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात खेरवाडी विभागाचे सहायक आयुक्त कैलासचंद्र आव्हाड यांची डोंगरी विभाग, भांडुप विभागाच्या सहायक आयुक्त सुरेखा कपिले यांची सशस्त्र पोलीस दल, ताडदेव विभागाचे सहायक आयुक्त संजय कुरुंदकर यांची माहीम विभाग आणि डोंगरी विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंगटे यांची दक्षिण नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर, विनंतीनुसार पोलीस कल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर गायके यांची दहिसर विभाग आणि आर्थिक गुन्हेशाखेतील सहायक आयुक्त मृत्यूंजय हिरेमठ यांची आझाद मैदान विभागात नियुक्ती करण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त/पोलीस अधिक्षक पदी बढती मिळालेल्या 9 अधिकार्यांना त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. यात दादर विभागाचे सहायक आयुक्त अविनाश कानडे, देवनार विभागाचे सहायक आयुक्त नितीन जाधव, अंधेरी विभागाचे सहायक आयुक्त सुनिल गावकर, माहीम विभागाचे सहायक आयुक्त दिपक देशमुख, आझाद मैदान विभागाचे सहायक आयुक्त धर्मपाल बनसोडे, वाहतूक विभागातील सहायक आयुक्त अभय धुरी, मध्य नियंत्रण कक्षाच्या सहायक आयुक्त प्रिया डहाके आणि पश्चिम नियंत्रण कक्षाचे सहायक आयुक्त संजय पाटील यांचा समावेश आहे.
मुंबई पोलीस दलात वरीष्ठ पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या 16 अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वरळी पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल कोळी आणि मालवणी पोलीस ठाण्याचे वपोनि शेखर भालेराव यांची संरक्षण व सुरक्षा विभाग,आर्थिक गुन्हेशाखेतील वपोनि राजेंद्र सांगळे यांची वाहतूक विभाग, नेहरुनगर पोलीस ठाण्याचे वपोनि चंद्रशेखर भाबल आणि शबाना शेख यांची विशेष शाखा-एक, सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वपोनि सुभाष बोराटे यांची विशेष शाखा-दोन, साकीनाका पोलीस ठाण्याचे वपोनि बळवंत देशमुख यांची घाटकोपर पोलीस ठाणे, भायखळा पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक खोत यांची कुर्ला पोलीस ठाणे, कांदिवली पोलीस ठाण्याचे वपोनि दिनकर जाधव आणि भांडुप पोलीस ठाण्याचे वपोनि नितिन उन्हवणे यांची आर्थिक गुन्हेशाखेत बदली करण्यात आली आहे.
वांद्रे पोलीस ठाण्याचे वपोनि राजेश देवरे यांची वाहतूक विभाग, आंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि बंडोपंत बनसोडे आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या वपोनि ज्योती देसाई यांची सशस्त्र पोलीस दल, मलबारहील पोलीस ठाण्याचे वपोनि राजन राणे यांची डोंगरी पोलीस ठाणे, गावदेवी पोलीस ठाण्याचे वपोनि दत्ताराम गिरप यांची नवघर पोलीस ठाणे आणि सागरी दोनचे वपोनि राजेंद्र कदम यांची आझाद मैदान पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एकूण 43 पोलीस निरीक्षकांना वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. यात विनय घोरपडे यांना डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, चीमाजी आढाव यांना मालवणी पोलीस ठाणे, विवेक भोसले यांना गावदेवी पोलीस ठाणे, रवींद्र काटकर यांना वरळी पोलीस ठाणे, दिपक बागुल यांना टिळकनगर पोलीस ठाणे, नागराज मजगे यांना चेंबूर पोलीस ठाणे, अरविंद चंदनशिवे यांना ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे, कलाम शेख यांना सर जे. जे. मार्ग पोलीस ठाणे, मनीषा शिर्के यांना सायन पोलीस ठाणे, संदीप विश्वासराव यांना कांदिवली पोलीस ठाणे, गणेश पवार यांना वर्सोवा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, गुन्हेशाखेतील महेश तावडे, विनायक चव्हाण यांच्यासह एकूण 13 अधिकार्यांना ते कार्यरत असलेल्या विभागात बढती देऊन नियुक्ती देण्यात आली आहे.
नंदकुमार गोपाळे यांच्या नियुक्तीने उंचावल्या सर्वांच्या भुवया
बदली होऊन मुंबईत नियुक्ती मिळालेल्या 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पोलीस ठाण्यांच्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. यात नंदकुमार गोपाळे यांना भायखळा पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, राजेंद्र आव्हाड यांना दादर पोलीस ठाणे, शितल राऊत यांना भोईवाडा पोलीस ठाणे, दत्तात्रय खंडागळे यांना भांडूप पोलीस ठाणे, मुरलीधर करपे यांना आरसीएफ पोलीस ठाणे, ज्ञानेश्वर वाघ यांना लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.