पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी खासदार कॅश फोर क्वेरी प्रकरणात संसदेतून निलंबित झालेल्या महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता तृणमूल काँग्रेस कडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
तृणमूल काँग्रेस (TMC) ने लोकसभा निवडणूक 2024 साठी रविवारी (10 मार्च) 42 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. टीएमसीच्या या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष, माजी खासदार महुआ मोईत्रा यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे.
कोलकाता येथील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर तृणमूल काँग्रेसने २०१९ नंतर प्रथमच सभा घेतली आहे. 2019 मध्ये झालेल्या सभेत 19 विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या जागांची संख्या 34 वरून 22 पर्यंत घसरली, तर भारतीय जनता पक्षाने (भाजप) चमकदार कामगिरी करत राज्यात 18 जागा जिंकल्या. पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आठ आमदार आणि दोन खासदार सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत.
महुआ यांनी पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. त्यानंतर लोकसभेच्या नैतिक आचरण समितीने या प्रकरणात महुआ यांना दोषी ठरवत संसदेतून निलंबित केले होते. ८ डिसेंबर २०२३ ला त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. (Mahua Moitra News)
हेही वाचा