पुढारी ऑनलाइन डेस्क : Mahashivratri 2023 : वर्ष 2023 ची महाशिवरात्री आज 18 फेब्रुवारीला आहे. महाशिवरात्री ही शिवभक्तांसाठीचा सगळ्यात मोठा सण असतो. अनेक परंपरांच्या मान्यतेनुसार महाशिवरात्री ही शिव-पार्वतीच्या विवाहाचा सोहळा आहे. तर काही धार्मिक मान्यतेनुसार शिवाचा जन्मदिवस म्हणूनही महाशिवरात्री मानली जाते. मात्र, शिव-पार्वतीचा विवाह सोहळा म्हणूनच अधिक मान्यता आहे. शिव-शक्तीचा एकरूप होण्याचा हा सोहळा आहे. त्यामुळे अनेक शिवभक्त आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तीभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात. महाशिवरात्रीचे व्रत करताना या व्रताचे नियम जाणून घेणे महत्वाचे असते. नियमानुसार व्रत केल्याने शिवजी प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात…
Mahashivratri 2023 : महाशिवरात्री व्रताचे नियम हे कडक असतात. व्रताचे संकल्प करताना या नियमांचा देखील संकल्प करावा
चतुर्दशी तिथीच्या प्रारंभाने व्रताचा संकल्प करावा. तुम्ही निर्जला व्रत करणार आहात का फलाहार करून व्रत करणार आहे. त्याचा संकल्प करावा. महाशिवरात्रीचे व्रत दुस-या दिवशी तिथी समाप्तीनंतर महादेवाला नैवेद्य अर्पण करून केले जाते.
जर तुम्ही निर्जला व्रत करणार असाल तर व्रताचे पारण करताना शुभ वेळेला पाणी प्यावे. तसेच फलाहार करून व्रत करणार असाल तर केवळ फळ खावे. मात्र व्रताच्या नियमानुसार तुम्ही केवळ एक वेळ फळं खाऊ शकता. दोन्ही वेळ फळ खाता येत नाही.
फलाहार करून व्रताचा संकल्प केल्यास शाबुदाना खिचडी, इत्यादी उपवासाचे पदार्थ खाऊ नये. कोणताही संकल्प न करता तुम्ही व्रत करणार असाल तर किमान मीठाचे पदार्थ खाऊ नये. महाशिवरात्रीच्या उपवासाला मीठ खाल्लेले चालत नाही. त्यामुळे फराळाचे पदार्थ बिना मीठाचे करावे किंवा काळे किंवा सेंधेलोन मीठ वापरावे.
व्रताच्या दिवशी दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवावा. महाशिवरात्रीच्या व्रतात या मंत्राच्या जपाचे अनन्य साधारण महत्व आहे.
महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र वाहावे. शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. तसेच यादिवशी शिव-पार्वती विवाहची कथा अवश्य ऐकावी. शिवासह माता पार्वती आणि त्यांच्या पूत्रांची पूजा देखील अवश्य करावी.
व्रताच्या दिवशी झोपू नये. संपूर्ण रात्र जागरण करत शिवाचे ध्यान करावे. मध्यरात्री शिवाची आरती करावी. नंतर भजन कीर्तन करून मनाची शुद्धी करावी
तसेच भगवान शिवाच्या पिंडीवर दूध वाहताना घरातील कोणतीही व्यक्ती दूधाच्या सेवन करण्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
हे ही वाचा :