Ajit Pawar Death Pudhari
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजित पवारांनी मृत्यूच्या काही तासांपूर्वी काय ट्विट केलं होतं?

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळील विमान अपघातात निधन झाले. दाट धुक्यामुळे पायलटला धावपट्टी दिसली नाही व लँडिंगदरम्यान विमान कोसळले.

Rahul Shelke

Ajit Pawar Death: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती येथे हा विमान अपघात झाला. लँडिंग दरम्यान विमान कोसळले. अपघात होताच त्याचे तीन तुकडे झाले आणि आग लागली. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये दाट धुक्यामुळे पायलटला धावपट्टी दिसली नाही आणि त्यामुळे विमान दिशाहीन झाले.

विमानाने सकाळी 8.10 वाजता मुंबईहून उड्डाण केले आणि सकाळी 8.45 वाजता रडारशी संपर्क तुटला. अजित पवारांच्या निधनानंतर, त्यांचे शेवटचे ट्विट व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये अजित पवार यांनी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

अजित पवार यांनी त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये काय म्हटले?

अजित पवार यांनी ट्विट करत राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली, त्यांनी ट्विटमध्ये ''आपल्या विश्वासू राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय :...''

अजित पवार आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते, जिथे ते चार सभांना संबोधित करणार होते. बारामतीत त्यांचे विमान उतरण्यापूर्वीच ते कोसळले. विमानातील कोणताही प्रवासी वाचला नाही. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. सरकारने त्यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT