महाराष्ट्र

Weather Forecast | पुढील ५ दिवस राज्यातील ‘या’ भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  यंदा मान्सून दोन दिवस आधीच (गुरुवार. दि. ३० मे) केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान मान्सून लवकरच महाराष्ट्रात देखील पोहचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तवला आहे.

Weather Forecast: 'या' राज्यांनाही मान्सूनपूर्वचा इशारा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीननुसार, पुढील ५ दिवस गोवासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतातील बहुतांशी राज्यांना देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याचेही भारतीय हवामान विभागाने (Weather Forecast) सांगितले आहे.

पुढील २ दिवसात मान्सून कर्नाटकात

मान्सून पुढे सक्रीय होण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, लद्वीप क्षेत्र आणि केरळ, कर्नाटक आणि रायलसीमाचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालचा उपसागरचा आणखी काही भागात मान्सून सक्रीय स्थिती (Weather Forecast) निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने आज (दि.२ जून) दिलेल्या बुलेटीनध्ये स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT