विदर्भ

यवतमाळ : बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

अमृता चौगुले

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण म्हणून बैलपोळा हा सण ओळखला जातो. राळेगाव तालुक्यातील सराई येथे हा सण साजरा होत असताना दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, गजानन राजूरकर (वय २५) आणि रावबा टेकाम (वय ४२) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. आज पोळा सण असल्याने बैलजोडीला सजविले जाते. त्यापूर्वी त्यांची आंघोळ घातली जाते. त्यासाठी दोन्ही शेतकरी बैलजोडी घेऊन गावातील ठमके यांच्या शेतात गेले. तेथे तलावसदृश्य असलेल्या खड्ड्यात बैलजोडी घेऊन उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते गाळात फसले आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT